Share

संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा, 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

Published On: 

मुंबई : जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही खबरदारी म्हणून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. याचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवरही झाला आहे. आता कुठं शेतकऱ्यांनी कष्टानं शेतात पीक उत्पादन केलं होतं, त्यातच लॉकडाऊनने बाजारपेठेवर मोठे दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान होत आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करून काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर नव्याने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याचीच अंमलबजावणी सध्या होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत नुकतीच याबाबत माहिती दिली. राज्यातील जवळपास 19 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. ३१ मार्च अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. याचा राज्यातील थेट १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत ३१ मार्च पर्यंत राज्यातील १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,९६६.२१ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५,४०७ कोटी १३ लाख रुपये जमा करण्यात आले. तसेच व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६,५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!