नाशिक : देशात कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण करण्यावर भर दिला जातोय. यासाठी खबरदारी म्हणून अनेक नागरिक लस घेत आहेत. मात्र अनेक लोकांनी लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम झाले असल्याचे सांगितले आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नाशिक शहरातील सिडको भागातील अरविंद जगन्नाथ सोनार या ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चक्क लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचा अजब प्रकार घडला आहे. अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे.
त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याची बातमी एका वृत्तवाहिनीवर बघितली. हे पाहून त्यांनी सहज आपल्या आई वडिलांनावर देखील तसाच प्रयोग करून पाहायला तर आईला असे काही झाले नाही. मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचे यातून समोर आले. यानंतर त्यांनी खासगी वैद्यकीय व्यवसायिकांशी संपर्क साधला. त्यांनी देखील हा अनोखा प्रकार असल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपने लोकशाही संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलंय – अजित पवार
- पवारांसारखा धुरंधर नेता असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात एकहाती सत्ता का मिळवू शकला नाही?
- शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, हे सरकार पाच वर्ष टिकेलच – शरद पवार
- ‘भाजपच्या यशामागे मोदींचा चेहरा, तेच भाजपचे नेते’, राऊतांनी कौतूक केल्याने भुवया उंचावल्या
- चंद्रकांतदादांनी ‘असं’ करायला नको होतं, जयंत पाटलांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
