🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटी आणि फॅशन यांचा चांगलाच मेळ आपल्याला पहायला मिळतात. यामध्ये अधिकतर तुम्ही अभिनेत्रींना पाहिले असेल, यात बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीत, अभिनेता आयुष्मान खुरानाचा यामध्ये समावेश आहे. सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या बॉम्बर जॅकेटमध्ये आयुष्मानचा डिस्को लूक जॅकेटमुळे सध्या चर्चेत आहे. मात्र वेबसाईटवर या जॅकेटची किंमत ऐकून नक्कीच धक्का बसला आहे.
आयुष्मानचा आगामी ‘चंदीगड करे आशिकी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. आयुष्मान सध्या आपल्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान आयुष्मान एका सुपर स्टायलिश सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या बॉम्बर जॅकेटमध्ये दिसलाआयुष्मानचा डिस्को लूक जॅकेट पाहून चाहतेही इम्प्रेस झाले आहेत. तसेच, ते अभिनेत्याच्या लूक आणि आऊटफिटचेही दीवाने झाले आहेत. आयुष्मानचे सोनेरी आणि चंदेरी बॉम्बर जॅकेट डिझायनर गौरव गुप्ताचे आहे. मात्र, हे सामान्य जॅकेट नाही. हे जॅकेट ‘इकोकारी’ ने बनवले आहे. या जॅकेटचे फॅब्रिक प्लॅस्टिक रॅपर्स, बाटल्या आणि बायोडिग्रेडेबल उत्पादने यांसारखा समुद्रातील कचरा वापरून बनवले आहेआयुष्मानने आपले जॅकेट पांढरा टी-शर्ट, पांढरी पँट आणि पांढऱ्या स्नीकर्ससह पूर्ण केले आहे. आयुष्मान प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. अभिनेत्याच्या जॅकेटचे चाहते होत आहेत आणि त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत. डिझायनर गौरव गुप्ताच्या वेबसाईटवर या जॅकेटची किंमत ६० हजार रुपये इतकी आहे.यामुळे बऱ्याच जणांना धक्का बसला आहे.
https://www.instagram.com/p/CWSioOWlReQ/?utm_medium=copy_link
आयुष्मानने सन २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटात काम केले. यामध्ये ‘बाला’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तारक मेहता ..’तील सोनूने चक्क साडी नेसून गेली जीममध्ये, नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
- औरंगाबादेत जिल्हा व्यापारी महासंघाची निवडणूक तोंडावर; कोण होणार नवीन अध्यक्ष?
- हे तर असं झालंय की मांजर कधीच उंदीर खातं नाही- अनिल बोंडे
- मेल्ट्रॉन प्रकरणातील एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला; एक अजूनही फरार..
- आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला, आम्हीही रस्त्यावर उतरावे का? ओवैसींचा ठाकरे सरकारला सवाल..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
