मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संखेत भर पडताना पाहायला मिळत आहे. अशात राज्यात शासना कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचाच विचार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे अनुदान मिळण्यास रिक्षाचालकांना अडचणी येत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत.
परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे.
ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना व रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केले जाईल. यासाठी मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेणे किंवा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे परिवहन उपायुक्त यांनी कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अमितकुमारांनी ही गोष्ट आधी सांगितली असती तर आम्ही सुधारणा केली असती – आदित्य नारायण
- ‘लसींची व्यवस्था नसताना लस उत्सव कशाला साजरा केला?’, प्रियंका गांधींचा मोदींना सवाल
- भाजपच्या अतुल भातखळकरांकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या संवादाची नक्कल!
- ‘टीका करण्याऐवजी सल्ले द्या’, राजनाथ सिंहांचा काँग्रेसला टोला
- ‘घरी कडी लावून बसलेल्यांना रिकामटेकडा म्हणतात’, भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला


