Share

‘लसींची व्यवस्था नसताना लस उत्सव कशाला साजरा केला?’, प्रियंका गांधींचा मोदींना सवाल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रकोप जगासह भारतातही वाढत आहे. देशात सध्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. पण देशातील अनेक राज्यात लसींचा तुटवडा जाणवत असल्यामुळे लसीकरणाला खीळ बसली आहे. भारतातील लोक करोनासोबत मोठी लढाई लढत आहेत. कोरोनामुळे देशभर परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. पण देशात लसींचा तुटवडा जाणवतोय. या मुद्द्यावरून कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.

ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, ‘भारत हा सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भाजपा सरकारने १२ एप्रिल रोजी लसीकरणाचा उत्सव साजरा केला, परंतु कोणत्याही लसीची व्यवस्था केली नाही आणि या ३० दिवसात देशात लसीकरण ८२ टक्क्यांनी कमी झाले आहे. मोदीजी लस कारखान्यांमध्ये गेले, फोटो काढले. परंतु जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या सरकारने प्रथम लस ऑर्डर का केली? अमेरिका आणि इतर देशांनी भारतीय लसी कंपन्यांना आधीचं ऑर्डर दिली होती. याची जबाबदारी कोण घेईल?”, असा प्रश्न देखील प्रियांका गांधी यांनी विचारला आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाची स्थिती हाताळण्यावरून काँग्रेस कार्यकारिणी समितीने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यानंतर ‘कोरोनाविरुद्धच्या लढ्याबाबत काँग्रेस पक्ष जनतेची दिशाभूल करीत असून देशात अकारण भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांचे वर्तन दुटप्पीपणाचे आणि खुजेपणाचे असल्याचे जनतेच्या स्मरणात राहील, असेही नड्डा यांनी म्हटलेय.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!