मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्यानं झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर योगी सरकार विरोधातील रोष वाढला आहे. देशभर संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेससह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजप आणि पंतप्रधान मोदींची अधिकृत ‘पॉलिसी’ आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असा संतप्त सवाल त्यांनी केला. उत्तर प्रदेशात सध्या आंदोलनांना चिरडण्याची नवी प्रथाच सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केलाय.
विरोधकांच्या टिकेनंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत, नाना पटोले हे लखीमपुरवरून टीका करत आहेत. ती चर्चा करूच पण राज्यातील शेतकरी द्रोही राज्य सरकारबद्दल कधी बोलणार? असा प्रतिप्रश्न उपाध्ये यांनी केला आहे.
नाचवत दाखवत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू सध्या सुरू आहे. वादळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी अजूनही वाऱ्यावरच आहे, आणि आता अतिवृष्टीग्रस्तांची भर पडली आहे. 3/3
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 4, 2021
ते म्हणाले की, ‘शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे लखीमपुरवरून टीका करत आहेत. ती चर्चा करूच. पण महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही राज्य सरकारबद्दल कधी बोलणार? मुख्यमंत्री ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले असून अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्यास कवडीचीही मदत न देता पाठ फिरविणारे हे सरकार आहे. मुख्यमंत्री तर बाहेर पडत नाहीतच. पण पालकमंत्रीही साध भेटायला गेले नाहीत.’
‘आता अतिवृष्टीच्या भीषण संकटात सापडून,उस, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या हानीमुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्याविषयी साधी सहानुभूतीदेखील न दाखविता नियमांच्या कागदावर बोटे नाचवत दाखवत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू सध्या सुरू आहे. वादळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी अजूनही वाऱ्यावरच आहे, आणि आता अतिवृष्टीग्रस्तांची भर पडली आहे’ अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात
- घरी जा, गुगलवर ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र’ सर्च करा; खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले काम
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

