नागपूर : आमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते. हे निलंबन चौकशी होईपर्यंत किमान दोन महिने मागे घेऊ नये, अशी मागणी राज्य वनसेवेतील अधिकाऱ्यांकडून होत आहे. येत्या ३० सप्टेंबरला त्यांचा निलंबन कालावधी संपणार आहे. त्यानंतर मंत्रालयातून येणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी आयपीएस अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे या करत आहेत. सरवदे शिवराय कुळकर्णी यांनी दिलेल्या अहवालात म्हंटले आहे की, दीपाली चव्हाण यांनी तीन पत्रे लिहीली आहेत. त्यात रेड्डी यांचाच शिवकुमारला पाठिंबा आहे, असे स्पष्ट म्हंटले आहे. रेड्डींना दीपाली यांनी रेकॉर्डिंगही ऐकवल्या असा स्पष्ट उल्लेख आहे. वारंवार तक्रारी करुनही त्यांना शिवकुमारचा त्रास कमी झाला नाही. तेव्हाच रेड्डी यांना सर्व सांगूनही ते कोणतीही कारवाई करत नाहीत असे दीपाली यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात नमुद आहे.
या प्रकरणात रेड्डी दोषी नव्हते तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची तडकाफडकी बदली का केली? दीपाली च्वहाण यांच्या मृत्यूपूर्व पत्रामध्येही रेड्डी कोणतीच कारवाई करत नव्हते? रेड्डी यांना सहआरोपी का करण्यात आले नाही? जिल्हा पोलीस अधिकारी जाहिरपणे रेड्डींना क्लिन चिट का देत होते? असे गंभीर प्रश्न आहेत.
त्यांनी दिलेल्या अहवालात रेड्डीविरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्यानंतर त्यांच्यावरील आरोपपत्र मंत्रालयातील वनविभागाने ई-मेल केले आहे. त्यांचा निलंबन काळ अवघा आठ दिवस राहिला असतानाही वनबलप्रमुखांनी नेमलेल्या समितीचा मुख्य अहवाल समितीला दुसरा अध्यक्ष मिळूनही समोर आला नाही. त्यामुळे हा चौकशी अहवाल लांबवण्याचा प्रकार सुरु असल्याचा सूर उमटत आहे.
रेड्डी यांचे निलंबन दोन महिने मागे घेऊ नये मागे घेतलेच तर त्यांना कोणत्याही पदावर नियुक्ती देऊ नये, जेणेकरुन ते या प्रकरणावर दबाव टाकतील. असे झाल्यास दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण दिले जाऊ शकते. त्यामुळे त्यांना निलंबितच राहू द्या, अशी मागणी अधिकाऱ्यांतून केली जात आहे.
तर दुसरीकडे भारतीय वनसेवेतील दक्षिण भारतीय अधिकारी त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर अनेक आयएफएस अधिकाऱ्यांनी विविध मंत्र्यांसह मंत्रालयातही फोन केले होते. रेड्डी यांना चांगला वकिल शोधून देण्यासाठीही या लॉबीतील अधिकारी प्रयत्न करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महिलांवर अत्याचाराची तिसरी लाट आलीय कोरोनाची नाही; चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे
- ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले- छगन भुजबळ
- आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत असतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र..; हेमंत ढोमेची हळहळ
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- लातूरमध्ये क्रीडा केंद्र उभारा, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांची केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडे मागणी

