🕒 1 min read
मुंबई : सध्या बाजारात कार्स च्या नवनवीन व्हर्जन येत आहेत. यामध्ये आता टाटा मोटर्सने नवी टियागो XTA ही कार ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह लाँच केली आहे. कंपनीनं नव्या टियागो XTA ला ऑटोमॅटिक लाईनअपमध्ये सामील केलं आहे. यानंतर टाटा टियागो एएमटी ऑप्शन्ससह येईल. एएमटी ऑप्शनसह येणारी टाटा मोटर्सची ही चौथी कार असणार आहे. कंपनीनं या कारची सुरूवातीची किंमत 5.99 लाख रूपये इतकी ठेवली आहे.
याआधी टाटा टियागो 2016 मध्ये लाँच करण्यात आलेली कार आहे. लाँचिंगपासूनही टाटाच्या लाईनअपमध्ये ही एक मजबूत आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे. कंपनीने 2020 मध्ये त्यांच्या गुजरातमधील साणंद प्लांटमधून टियागोचे 3,00,000 युनिट्स रोलआउट केले होते. ही टाटाची इम्पाक्ट डिझाईन फिलॉसफीअंतर्गत बनलेली पहिली कार होती. टियागोला ग्लोबल NCap सुरक्षा टेस्टमध्ये चार स्टार रेटिंग मिळलं आहे. या कारच्या काही वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कार एयर बॅग, रियर पार्किंग असिस्ट आणि ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशनसह सादर करण्यात आली आहे.
या कारमध्ये आकर्षक फीचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये हर्मन या कंपनीचा 7 इंचाचा इन्फोटेन्मेंच टचस्क्रिन, 15 इंचाचे अलॉय व्हिल्स, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आदिंचा समावेश आहे. मार्केटमध्ये टाटा टियागोच्या या कारची स्पर्धा मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई आय 20 या कार्ससोबत असेल. यामध्ये 1199cc चं 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 84.48 Hp ची पावर आमि 113 Nm चा टॉर्क जेनरेट करतं. टियागोमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे पर्याय मिळतात. ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह या कारचे चार व्हेरिअंट XTA, XZA, XZA Plus, आणि XZA Plus ड्युअल टोन रूफ येतात.
महत्वाच्या बातम्या
- महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची तौबा गर्दी; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन


