अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल राहुरी तालुक्यात सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. कर्जत-जामखेड पाठोपाठ राहुरी तालुकाही लॉकडाऊन झाला असून, अहमदनगर शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण सापडत असून देखील शहरात लॉकडाऊन का होत नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नगर शहरात तर रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असून, मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे. अशीच स्थिती काही दिवसांपूर्वी कर्जत-जामखेड येथे होती. तेथे आ.रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन काही दिवस हे दोन्ही तालुके लॉकडाऊन करण्यास प्रशासनास भाग पाडले. आता राहुरी तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. या तालुक्याच्या तुलनेत नगरमध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र राहुरीचे नेतृत्त्व करणारे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेत राहुरी तालुका लॉकडाऊन करण्याचा निर्णय काल घेतला.
कर्जत-जामखेड आणि आता राहुरी या ठिकाणचे नेतृत्त्व लॉकडाऊन करून कोरोनाच्या साखळीला आवर घालण्याचा प्रयत्न करत असताना नगरचे नेतृत्त्व आणि प्रशासन मात्र याबाबत उदासीन का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नगरमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या कर्जत-जामखेड आणि राहुरीच्या तुलनेत मोठी आहे. या दोन ठिकाणची परिस्थिती लॉकडाऊनसारखी असेल, तर नगरमध्ये आणखी काय घडायला पाहिजे म्हणजे प्रशासन लॉकडाऊन करेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
फडणवीसांचा ढाण्या वाघ अडकला कोरोनाच्या विळख्यात
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर अटक…
मराठी अस्मितेचा पुळका असणाऱ्या शिवसेनेला ‘हे’ पटत का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

