मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे दररोज वाढतच आहे.कोरोनामुळे अशी भीषण परिस्थिती होत असताना महाराष्ट्रातील अनेक आमदारांना कोरोना झाला, त्यातून ते बरेसुद्धा झाले. पण आता महाराष्ट्रातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी ते मुंबईत आलेले होते. कोरोना चाचणी केल्यानंतर ते कामकाजात सहभागी झाले नाहीत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना ढाण्या वाघाची उपमा दिली होती. त्यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा मोठ्या मताने पराभव झाला. त्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेवर घेतलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं,तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
याआधी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सामाजिक न्याय व विषेश सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, आमदार मोनिका राजळे,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मंत्रालय मंत्र्यांना कोरोना होऊ नये यासाठी विषेश काळजी घेतली जात आहे. मंत्र्यांना मोजक्याच लोकांन भेटता यावं यासाठीही प्रयत्न करत जात आहेत. विधानसभेचं कामकाजही पुर्ण क्षमतेनं सुरू झालेलं नाही.
कोरोना काळात लोकांना आलेल्या अडचणी लक्षात घेता आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात सुट दिली आहे. एसटी बस, रेलवे, दुकाने, मॉल, खासगी बस सुरू करण्यात आल्या आहेत. पण सध्या राज्यातील मंदीर उघडावे म्हणून सरकारला विरोधी पक्ष धारेवर धरत आहे.
महत्वाच्या बातम्या:-
काँग्रेसला ‘या’ विषयात देखील भाव दिला जात नाही ; भाजयुमोने उडवली खिल्ली
कोरोनाबाबतचे नियम आणि निर्णय कागदावरच : देवेंद्र फडणवीस
मी ठणठणीत, तुम्ही पण काळजी घ्या- आ.मोनिका राजळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

