🕒 1 min read
पुणे : आघाडी सरकारमध्ये पैसे खान्याशिवाय कुणालाच काही कळत नाही. पैसे खाताना म्हणजे दरोडा घालताना जे कौशल्य लागतं नां, ते कौशल्यही यांच्याकडे नाही. कुठल्याही कामात सरकारमध्ये समन्वय नाही. एकमेकांचे हिशेब चुकते करण्यावरच यांचा भर आहे. अशी खोचक टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर केली.
चंद्रकांत पाटील पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते, यावेळी ते म्हणाले आघाडी सरकारमध्ये पैशे खाण्याशिवाय कुणालाच काही कळत नाही. पैशे खाताना म्हणजे दरोडा घालताना जे कौशल्य लागतं नां, ते कौशल्यही यांच्याकडे नाही. असा चिमटाही त्यांनी आघाडी सरकारला काढला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये पैसे खाण्याव्यतिरिक्त कोणालाच काही कळत नाही. कुठल्याही कामात सरकारमध्ये समन्वय नाही. एकमेकांचे हिशेब चुकते करण्यावरच यांचा भर आहे. सगळाच बेभरवशी कारभार चालू आहे. या सरकारमुळे गेल्या १९ महिन्यांत राज्यातील सर्व व्यवस्था कोलमडवल्या आहेत ! pic.twitter.com/TJEZbmvCso
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 20, 2021
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, एखादी गोष्ट करताना तीचा पुरावा मागे कशाला सोडता पुढे कोर्टात चॅलेंज केले जाणार आहे, कोर्ट हाणणार आहे, याची कुणालाच काळजी नाही. त्यामुळे बेभरोशी सरकार झाले आहे. मी कुठलीही अँबीशन नसलेला सामाजिक कार्यकर्ता आहे. मी आता चिंतेत आहे, तुमचे कमिशनर बेपत्ता आहेत. तुमचे डझनभर अधिकारी जेलमध्ये आहेत. ज्या मुंबई पोलिसांची पूर्ण जगामध्ये वाह वा असायची त्या पोलीस आयुक्तालाच तुम्ही बेपत्ता होण्यास भाग पाडलं. सगळच बेभरवशी कारभार चालू आहे. या सरकारमुळे गेल्या १९ महिन्यांत राज्यातील सर्व व्यवस्था कोलमडवल्या आहेत. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
