पारनेर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील १७ जागा याआधी बिनविरोध झाल्या आहेत. तर इतर चार जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. बॅंकेच्या जागा बिनविरोध होण्यासाठी मोठे राजकारण झाले. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी मारलेला टोला अनेकांना लागणार आहे.
जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त शिवसेनेचे सेवा संस्थेचे उमेदवार रामदास भोसले व बिगरशेती मतदारसंघाचे उमेदवार दत्तात्रेय पानसरे यांच्या प्रचार मेळाव्यात डॉ. विखे पाटील बोलत होते. यानिमित्त तालुक्यात जिल्हा बॅंकेसाठी भाजपचा शिवसेना उमेदवारास पाठिंबा असल्याचे जाहीर झाले आहे.
या प्रचार मेळाव्यात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत जिल्ह्यातील अनेक नेत्यांना फटकारले आहे. “जिल्ह्यातील राजकीय . विखे घराण्याने कधीही राजकारणात सेटलमेंट केली नाही. आम्ही जनतेसाठी राजकारण करीत आहोत. सामान्य जनतेसाठी कितीही नुकसान झाले तरी काही फरक पडत नाही; कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत. आमची तिसरी पिढी राजकारणात आहे. आम्ही कधीही टक्केवारीचे राजकारण केले नाही,” असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
यावेळी ते म्हणाले कि, ज्या दिवशी विखे घराणे सेटलमेंटचे राजकारण करील, त्या दिवशी सामान्यांची हार झालेली असेल. तालुक्यातील राजकारणात अपेक्षेची सवय लागली आहे. राजकारणात अर्थकारण जुळत गेले, तर मी राजकारण सोडून देईन. आम्ही जनतेसाठी सत्तासंघर्ष करतो. जिल्हा बॅंकेत विखेंची माघार’ असे काही वृत्तपत्रांत आले. आम्ही पूर्वीच्या निवडणुकीतही माघार घेतली होती. माघारीचे काही वाटत नाही; कारण त्यातही काही तरी दडलेले असते.
डॉ. विखे पाटील म्हणाले कि, आम्ही आमचे फोटो व्हायरल केले, तर सोशल मीडिया हॅंग होईल. आम्ही असे आहोत, असेच राहणार. आम्हाला जनतेला सांगावे लागत नाही, की आम्ही किती साधे आहोत? के. के. रेंजबाबत राजकारण केले गेले. शेतकऱ्यांना सरावाच्या काळातील जमिनीचे भाडे मिळावे, अशी माझी मागणी होती; मात्र त्यात राजकारण आले.
आम्हीच शेतकऱ्यांच्या जमिनी सोडविल्या, असे सांगून फटाके वाजविले; पण स्वातंत्र्यापासून शेतकऱ्यांच्या जमिनीची के. के. रेंजमध्ये असणारी स्थिती तशीच आहे. माजी आमदार विजय औटी यांचे काम चांगले असून, पुढील वेळी ते दुप्पट मतांनी विजयी होतील, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्हा बँकेत भाजप एकाकी पडणार?
- जेव्हा कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा अटलजी मोदींना राजधर्म शिकवत होते
- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्तांनी घेतली लस
- ‘या’ मुलीने आपल्याच मृत्यूची केली होती भविष्यवाणी,जिथे सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह
- …तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील : निर्मला सीतारमण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
