Share

‘दिल्लीतील नेते, प्राणी मेला तरी श्रद्धांजली देतात, पण…’, शेतकरी आंदोलनावरून सत्यपाल मलिक आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : मागील जवळपास वर्षभरापासून केंद्र सरकारने आणलेले कृषि कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करत दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु अजूनही या कायद्यांसंदर्भात कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

तेजा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या जयपूरमधील जागतिक जाट संमेलनात बोलत असतांना मलिक म्हणाले की,’६०० हून अधिक शेतकरी शहीद झाले इतकं मोठं आंदोलन देशानं कधीही पाहिलेले नाही. एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला तरी दिल्लीतील नेत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जाते, महाराष्ट्रात आगीची घटना घडली त्यावरही दिल्लीतून श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र ६०० शेतकऱ्यांच्या मृत्यूवर अद्यापही श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. त्यावर कुणीही बोलत नाही. शेतकरी पार्श्वभूमीचे लोकही संसदेत उभे राहून शेतकऱ्यांसाठी प्रस्ताव मंजूर करण्यास धजावत नाही. ही चांगली परिस्थिती नाही.’

दरम्यान, पुढे त्यांनी शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले,मी खूप दुखावलो होतो आणि रागावलो होतो. मी पंतप्रधान मोदींना भेटलो आणि त्यांना ते परिस्थितीचे चुकीचे आकलन करत असल्याचे सांगितले. या शिख किंवा जाटांना पराभूत करता येणार नाही. तुम्हाला वाटतं हे शेतकरी सहजपणे निघून जातील, पण तसे होणार नाही. त्यांच्या मागण्या मान्य करा. त्यांच्यासोबत दोन गोष्टी कधीही करू नका. एक त्यांच्यावर बळाचा वापर करू नका आणि दुसरं त्यांना मोकळ्या हाती पाठवू नका. कारण ते शेकडो वर्षे असे वर्तन विसरत नाहीत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!