Share

इतर पक्षातून आलेल्या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी; निष्ठावंतांचे पंख छाटले

Published On: 

मुंबई – मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चार मराठी चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. यात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ.भारती पवार,डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. दुसऱ्या टर्ममधील मंत्र्यांची नावे पाहता बहुतांशी खासदार हे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत. भाजपने आयारामांना संधी देताना निष्ठावंतांना डावलले असल्याचे यामध्ये दिसून येत आहे.

भाजपने महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा राजीनामा घेतला असून त्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले आहे. मात्र यापैकी भागवत कराड वगळता इतर तिन्ही खासदार हे पूर्वी शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये होते असे दिसत आहे.

कपिल पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपिल पाटील हे देखील भाजपचे ओबीसी चेहरा आहेत. ठाणे आणि नवी मुंबईत बहुसंख्येने असलेल्या आगरी समाजाचे ते नेते आहेत. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे हे नाव न देता दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची त्यांनी मागणी केली होती. या मागणीसाठी आगरी समाज आक्रमक झाला आहे. या समाजातील नेत्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजप आता शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

नारायण राणे हे शिवसेनेने नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री केले. पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपुरे राहिलेल्या राणे यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण त्यांना मंत्रीपद देण्यात आलं. कॉँग्रेस नेतृत्वावर टीका करत पक्षातून बाहेर पडल्यावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. अल्पावधीच हा पक्ष भाजपमध्ये विलीन करत राज्यसभेची उमेदवारी  मिळवली. 2019 मध्ये नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या देवळा गटातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा असणाऱ्या भारती पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि दिंडोरी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेचा उमेदवार आयात केल्याने भारती पवार नाराज होत्या. ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती मिळाली, असं म्हटलं जातं. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्याने दिंडोरीत त्यांच्यासह पक्षाचीही ताकद वाढली आहे. त्या जोरावर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या धनराज महालेंचा पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!