लातूर: जिल्ह्यात मागील काही वर्षात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ परिवाराच्या माध्यमातून कृषीवन आणि सार्वजनिक वन विकासासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ व ‘ओव्हरसीस व्हालिंटर्स फॉर बेटर इंडियाच्या’ (ओव्हीबीआय) संस्थेच्या एक लाख वृक्ष लागवडीच्या यंदाच्या उपक्रमास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते गुरूवारी नागझरी येथे सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी वनक्षेत्रातील वृक्षांची पाहणी केली. नवीन वृक्ष लागवडीचा शुभारंभ करून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ व ‘आयव्हीबीआय’ संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी व नागरिकांना सहभागी करून वृक्षसंवर्धन चळवळ गतिमान करण्याचा मानस व्यक्त केला तसेच नागझरी व इंद्रठाणा येथील वृक्ष लागवड प्रकल्पांची पाहणी केली.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या परिवाराने मागील चार वर्षांत मांजरा नदीकाठी तीन गावात ४५ एकर जमिनीवर नियोजन नियोजनबद्ध पद्धतीने ठिबक सिंचनचा वापर करून विस्तीर्ण जंगल तयार केले. कमी, मध्यम व दीर्घ कालावधीची वृक्षलागवड केली. विविध फळझाडे व फुलांची झाडे लावली. यामुळे पशुपक्ष्यांना अन्नही मिळेल व जंगलातली जिव चक्र चालू राहील. राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र लातूर जिल्ह्यात असून, ते एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात क्षेत्र पाच टक्के पर्यंत वाढविण्याचे काम हाती घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पीक विमा संदर्भात सरकारची भूमिका संशयास्पद; माजी मंत्री डॉ. कुटे यांचा आरोप
- स्वच्छता प्रिमियर लीगचे थेट लाईव्ह प्रक्षेपण खास औरंगाबादकरांसाठी! ८० कर्मचाऱ्यांचा सत्कार
- खासदार संभाजी राजे साधणार मराठा समाजातील युवकांशी संवाद, रमेश केरे पाटील यांची माहिती
- ‘फडणवीस सरकारचा कायदा अवैध, मराठा आरक्षणाला हरताळ फासण्याचे पाप भाजपचेच’
- कृषी कायद्यांवरील शरद पवारांच्या भूमिकेचे मोदी सरकारकडून स्वागत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

