Share

पीक विमा संदर्भात सरकारची भूमिका संशयास्पद; माजी मंत्री डॉ. कुटे यांचा आरोप

Published On: 

बुलडाणा: माजी मंत्री संन्जय कुटे यांनी पिक विम्यावरून सरकारवर चांगलीच टीका केली आहे. सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. शुक्रवारी दि. २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पिक विमा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.

गेल्या वर्षापासूनचा पिक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला, आंदोलने केली, निवेदने दिली, परंतु कुठलीही दखल घेतली गेली नाही आणि सर्व प्रक्रियेत मात्र महा विकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांच्या आमदारांची आणि नेत्यांची भूमिका संशयास्पद असल्याची शंका माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी व्यक्त केली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमा संदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीला कंपनीचे अधिकारी उपस्थित राहिले नसल्याने डॉ. संजय कुटे यांनी या बैठकीतून निघून येत पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!