🕒 1 min read
मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला फोन केला. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन मला या वर्षीची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे, असं मुख्यमंत्री नांगरे पाटील यांना म्हणाले. नांगरे पाटलांनी खास फेसबुक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांच्या फोनबद्दलचा खास अनुभव शेअर केला आहे.
मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. सुखद धक्का देणारा मा.मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो, असं मुख्यमंत्री फोनवर म्हणाल्याचं नांगरे पाटलांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विश्वास नांगरे पाटील यांच्यातील 31 डिसेंबर रोजी रात्री झालेल्या संभाषणाची बातमी सर्व माध्यमांत प्रकाशित होत असतानाच भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. काय बातमी पेरली आहे… हे मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचे फोन उचलत नाही, शिवसैनिकांना फाट्यावर मारतात ती व्यक्ती मध्यरात्री एका मेसेजचं उत्तर देते हे अतिशयोक्ती आहे. PR टीमने कितीही उचलून धरलं तरी लोकं दूध खुळी नाही, आणि केलं जरी असेल तरी ते त्यांचं काम आहे, महाराष्ट्रावर उपकार नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
काय बातमी पेरली आहे.. हे मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचे फोन उचलत नाही, शिवसैनिकांना फाट्यावर मारतात ती व्यक्ती मध्यरात्री एका मेसेजचं उत्तर देते हे अतिशयोक्ती आहे. PR टीमने कितीही उचलून धरलं तरी लोकं दूध खुळी नाही, आणि केलं जरी असेल तरी ते त्यांचं काम आहे, महाराष्ट्रावर उपकार नाही. https://t.co/UKokbNV8Vx
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 4, 2021
महत्वाच्या बातम्या
- “जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी”
- औरंगाबाद नामांतरामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल- रामदास आठवले
- मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सुरुहोण्यापूर्वीच घरघर
- गृहमंत्री अमित शाहांची खिल्ली उडवली म्हणून कॉमेडियनला खेचले पोलीस ठाण्यात
- औरंगाबाद नामांतर : ‘…तेव्हा छत्रपतींच्या नावाने दुकानदारी करणारे बोलभांड कुठल्या बिळात लपतात ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
