🕒 1 min read
मुंबई :- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही जुलमी औरंगजेबाच्या नावाने असणाऱ्या औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर झाले नाही.
आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सध्या राज्यात शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. मनसे आणि भाजपने हा मुद्दा लावून धरला असून त्या माध्यमातून शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी आता नवी मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याची जोरात चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य हे रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे आहे. आपण सर्वधर्मसमभाव मानतो. नाव बदलण्याच्या वादामुळे विकासाला खीळ बसते व भाजप सारख्या पक्षाला हेच पाहिजे त्यामुळे एखाद्या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून त्या जिल्ह्याला संभाजीनगर नाव देण्यात यावे व हा प्रश्न कायमचा सोडवावा अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाने केली आहे.
दरम्यान, आता या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- पीसीएमसी ते फुगेवाडी या सहा किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण
- औरंगाबाद नामांतरामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल- रामदास आठवले
- पंतप्रधानांचा सौरव गांगुलीला फोन, प्रकृतीबाबत केली विचारणा
- गृहमंत्री अमित शाहांची खिल्ली उडवली म्हणून कॉमेडियनला खेचले पोलीस ठाण्यात
- ‘मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचे फोन न उचलनारा मध्यरात्री एका मेसेजचं उत्तर देतो हे अतिशयोक्ती आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
