Share

यूपीएससीचे नियम बदलणार?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- मोदी सरकारकडून देशभरात होणाऱ्या लोकसेवा परीक्षांच्या नियमांमध्ये अमूलाग्र बदल केला जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत नोकरी आणि केडर निवडण्यासाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचं पुस्तकी ज्ञानासह व्यवहारिक ज्ञानही तपासलं जाणार आहे. परीक्षेच्या निकालानंतर होणाऱ्या प्रशिक्षणाच्या आधारवर ते कोणत्या सेवेत जाण्यासाठी पात्र आहे, हे ठरवंल जाईल.

सध्याच्या पद्धतीनुसार सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला आयएएस, आयपीएस, आयएफएस या सेवा निवडण्याची मुभा होती. मात्र आता त्यामध्ये बदल होणार आहे. देशाच्या नव्या आयएएस अधिकाऱ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा ट्रेनिंगमध्ये व्यवहारिक ज्ञानही मिळावं यासाठी हा बदल केला जाणार आहे. राजकीय यंत्रणा आणि त्याचा प्रशासनावरील प्रभाव समजावा, यासाठी मोदी सरकारने सध्याच्या यंत्रणेमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे.

हे नवे बदल याच वर्षी लागू होतील, असं म्हटलं जात आहे. या नव्या सिस्टमनुसार अशी शक्यताही आहे की, ट्रेनिंगमधील सुमार कामगिरीमुळे परीक्षेतील टॉपरला आयएएस केडर मिळू शकणार नाही, तर त्याच्यापेक्षा कमी रँक असलेल्या उमेदवाराने ट्रेनिंगमध्ये चांगली कामगिरी केली तर तो आयएएस बनू शकतो.

अग्रवाल समितीच्या शिफारशी यंदाच लागू होणार!
– प्रशिक्षणाचा कमाल कालावधी एक वर्ष करावा

– गावांमध्ये जास्त काळ राहण्यासाठी अधिकाऱ्यांना जास्त वेळ मिळावा

– प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवण्याच्या पर्यायावरही विचार व्हावा

– फाऊंडेशन कोर्सचा अभ्यासक्रम बदलावा, सध्याच्या घडामोडींवर जास्त भर द्यावा

– ट्रेनिंगदरम्यान कमीत कमी परीक्षा व्हाव्यात, सध्याची यंत्रणेनुसार 300 गुणांची परीक्षा व्हावी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!