Share

‘नसीरुद्दीन शाहांंना ‘वेनसडे’मधील सर्वसामान्य माणूस समजत होतो, पण ते ‘सरफरोश’मधील ‘गुल्फाम हुसेन निघाले ‘

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : “नसीरुद्दीन शाह जी, आम्ही तुम्हाला ‘वेनसडे’मधील सर्वसामान्य माणूस समजत होतो, पण तुम्ही ‘सरफरोश’मधील ‘गुल्फाम हुसेन’ निघालात. पण आपण काँग्रेसच्या जमान्यात बॉम्ब फुटत होते, त्यावेळी तुमची मुले घाबरली नाही, पण आता ज्यावेळी मोदीजी काही पावले उचलतात, त्यावेळी तुमच्या मुलांना भिती वाटली.”, असे त्रिपुराचे भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी म्हटले आहे. तर “निवडणुक जवळ आल्या की, अशी विधान येतात, त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध करतो. नसीरुद्दीन शाह यांनी जे काम ‘सरफरोश’ सिनेमात केले, जी भूमिका त्यांनी केली, तीच भूमिका संशयास्पद वाटते.”, असे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी म्हटले.

त्यावर “मी जे काही म्हटलं होतं, ते काळजीत पडलेला भारतीय म्हणून वक्तव्य केलं होतं. मी बोलल्याने मला गद्दार ठरवलं गेलं. ज्या देशावर मी प्रेम करतो, त्या देशाबद्दल मी काळजी व्यक्त करतोय. हा गुन्हा कसा असू शकतो ?” असा अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्यंच्यावर झालेल्या टीकेवर प्रश्न उभा केला.

 

काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?

जमावाकडून होणाऱ्या हिंसाचारावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवापेक्षा गायीच्या हत्येला जास्त महत्त्व दिलं जातंय, असं ते म्हणाले. शिवाय आजच्या या समाजाता माझ्या मुलांचीही चिंता वाटते, असं त्यांनी सांगितलं.

समाजात विष पसरलंय. माझ्या मुलाच्या सुरक्षेची चिंता वाटते. कायदा हातात घेण्याची खुली सूट मिळाली आहे. मला धर्माचं शिक्षण मिळालं होतं. पण तिला (पत्नी) धर्माचं शिक्षण मिळालेलं नाही. कारण, ती लिबरल कुटुंबातून आहे. मी माझ्या मुलांना धर्माविषयी शिकवलं नाही. चांगलं आणि वाईट याचा धर्माशी संबंध नाही. पण मुलांची चिंता वाटते, की त्यांना कधी जमावाने घेरलं आणि विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम? तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नसेल,

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!