नवी मुंबई : सिडको, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयांशी संबंधित असलेले प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत, असे आदेश मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ठाणे जिल्ह्याच्या विकासाबाबत आढवा घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या महापालिकांसह जिल्हापरीषदेच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. या प्रसंगी उपस्थित राहून मंदा म्हात्रे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी म्हात्रे यांनी बेलापूरच्या प्रकल्पग्रस्तांचे मालमत्ता कार्ड, सिडकोची फ्री होल्ड घरे, पोलिसांच्या मोडकळीस आलेल्या घरांची पुर्नबांधणी, मरिना प्रकल्प, एपीएमसी मार्केटचे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रूपांतर, एसआरए आदी प्रश्न मांडून ठाकरे यांचे लक्ष वेधले.
तसेच सिडको आणि मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून बेलापूर येथे खाडी किनारी मरीना प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परंतु, अद्याप सिडकोतर्फे निवीदा प्रक्रीया राबवण्यात आली नाही. नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा अद्याप विकास करण्यात आलेला नाही. हे मुद्दे उपस्थित झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी हे प्रश्न सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मरीना प्रकल्पाच्या निवीदा प्रक्रीया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच शहरातील झोपडपट्ट्यांचा झोपडपट्टी पुर्नविकासाच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. नवी मुंबईतील पोलिसांच्या मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश् मार्गी लागणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

