🕒 1 min read
सोलापूर : जागतिक महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील 190 पेक्षा अधिक देशात थैमान घातले आहे. चीनमध्ये तयार झालेल्या या व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र विशेषज्ञांच्या मते पुढील एक वर्षात जगातील 70 टक्के लोकसंख्या या व्हायरसच्या विळख्यात सापडू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
भारतात या व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर मदतीसाठी अनेक दानशूर पुढे येत असल्याचे चित्र आहे.सर्व मुख्य पक्षांच्या आमदार-खासदारांनी आपापल्यापरीने मदत करायला सुरुवात केली आहे. यात वंचित बहुजन आघाडी देखील आता मागे राहिली नसून वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये पाठवण्याचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे.इतर पक्षाच्या ही नगरसेवकांनी सुद्धा आपले मानधन द्यावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले.
देशभरामध्ये व महाराष्ट्रामध्ये कोरोणा सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून आपल्या महाराष्ट्रामधील जनतेला एक सामाजिक दृष्टिकोनातून एक छोटीशी मदत म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक नगरसेवक आनंद बाबुराव चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी ,नगरसेविका ज्योती बमगोंडे यांचे मानधन सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला असून सो. म.पा.आयुक्तांना हे पत्र देण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका मधील इतर पक्षाच्या नगरसेवकांनी सुद्धा आपले मानधन मा. मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये द्यावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
