औरंंगाबाद : नातीच्या लग्नासाठी जाणा-या वृध्देच्या बॅगेतून साडेतीन तोळ्याचे दागिने चोराने लांबवले. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास सिडको बसस्थानकात घडली.
दत्तनगरातील ५६ वर्षीय वृध्दा नातीच्या लग्न समारंभासाठी जालना येथील रामनगरला जाण्यासाठी २८ फेब्रुवारीला निघाली होती. सकाळी दहाच्या सुमारास सिडको बसस्थानकात वृध्दा पोहोचली. यावेळी लग्नात घालण्यासाठी त्यांनी एक तोळ्याची एक दाणी आणि अडीच तोळ्याची सोन्याची पोत हातातील बॅगेत ठेवली होती.
जालन्याकडे जाणा-या एसटीचे तिकीट काढत असताना वृध्देच्या बॅगेतील सोन्याचे साडेतीन तोळ्याचे दागिने चोराने लांबवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने लग्नाहून परतताच सोमवारी एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठत रात्री साडेअकराच्या सुमारास तक्रार दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्सची धाड
- खास फीचर्सने ग्राहकांना आकार्षित करणाऱ्या रेनो किगरची डिलीव्हरी सुरु
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा


