Share

दारूण पराभव जिव्हारी, लालूंनी खाणे पिणे सोडले 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप आणि मित्रपक्षांनी शानदार विजय मिळविला आहे. अनेक विरोधी पक्षांचे या निवडणुकीत पानिपत झाले. यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा देखील समावेश आहे. लोकसभा निवडणूकीत बिहारमधून दारूण पराभव झाला आहे. राजदला राज्यात एकही सीट मिळवता आलेली नाही.

जागरण या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार,पक्षाला लोकसभा निवडणूकीत यश मिळवून देण्यात लालूंची मुले अयशस्वी ठरली आहेत. पुत्रांचे हे अपयश लालूंच्या चांगलेच जिव्हारी लागले असून त्यांनी सध्या खाणे पिणे सोडले असल्याचे समजते.

लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या पाटण्यातील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “लालूंनी दुपारचे जेवण तर पूर्णपणे बंद केले असून सकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण देखील कमी केले आहे. त्यामुळे त्यांना इन्सुलिन द्यायला देखील त्रास होत आहे. जेवणातील अनियमितता व नैराश्य यामुळे त्यांच्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो”, असे डॉ. उमेश प्रसाद यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!