Share

लॉकडाऊनमध्येही धावणार लालपरी 

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयाभरात ११ मार्च ते ०४ एप्रील या दरम्यानच्या काळात अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच शनिवार आणि रविवारी कडक स्वरूपात लॉकलाडऊन करण्यात येणार असला तरी या दिवशी एसटीची बससेवा प्रवाशांसाठी सुरूच राहणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली आहे.

जिल्हयाभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण बदलत असून संसर्गामध्ये अख्ख कुटुंबच बाधित होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसापासून झपाटयाने वाढत आहे. त्या दृष्टीने आरोग्य सेवेच्या वाढीव चाचण्यांची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रशासन यशस्वीरित्या सामना करीत आहे. या वाढत्या संसार्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अशंत: लाकडाऊन लावण्याचा निणNय घेतला आहे. या अशंत: लॉकडाऊनचा नागरिकांनी त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हयात ११ मार्च ते ०४ एप्रील पर्यत अशंत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची (एसटी)ची बससेवा सुरूच राहणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी या पूर्वीच एसटीच्या अधिकाNयांसह चलक वाहक आणि प्रवाशांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या अशंत: लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाची बससेवा सुरूच राहणार आहे. मात्र प्रत्येक प्रवाशांनी मास्क वापरणे अत्यावश्यक असल्याचे विभाग नियंत्रक सिया यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!