मुंबई : उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराने संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी उत्तर प्रदेश आणि मोदी सरकारवर जोरदार टीका सत्र सुरु केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जलियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लखीमपूरची ही घटना म्हणजे एकप्रकारे जालियानवाला बाग हत्याकांडसारखीच घटना आहे. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. मात्र, देशातील शेतकरी या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील, असे पवार म्हणाले. पीडितांच्या नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या विरोधकांनाही सरकार अडवत आहे. या सरकारकडून लोकशाहीची हत्या सुरू आहे. पण आम्ही विरोधक शेतकऱ्यांचा सोबत आहोत’, असं शरदosbs पवार म्हणाले आहेत.
सर्वच पक्ष आता या प्रकरणाला पुढं करुन आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वेगवेगळी वक्तव्य करत आहे. दुर्दैव हे घटनेपेक्षा त्याचं राजकारण हे आहे, असं म्हणत फडणवीस म्हणाले आहेत.
लखिमपूरप्रकरणी उत्तरप्रदेश सरकार कारवाई करेलच. पण, महाराष्ट्रातील शेतकर्यांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टी, पुराने नुकसान झालेल्या राज्यातील आक्रोशित शेतकर्यांचा अधिक विचार राज्य सरकारने करावा, तरच त्यांना दिलासा मिळेल.https://t.co/mlIA1Ymcsx pic.twitter.com/vFf5K23tnf
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 6, 2021
अशा प्रकारचं राजकारण करुन काहीही मिळणार नाही. असा घटनेचे राजकारण करुन काही फायदा मिळेल असं वाटत असेल तर कितीही राजकारण केले तरी त्याचा फायदा मिळत नसतो, असं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपला फटका; पोटनिवडणुकीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
- ‘महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास वाढतोय, मुंबई महापालिकेवर एकत्र लढण्याचा विचार’
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

