Share

तर आम्ही प्रियांका गांधींचा बंगला पाडू- भाजप

Published On: 

हिमाचल: मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अडचणीत आलेल्या अभिनेत्री कंगणा रणौतचे कार्यालय बिएमसीने तोडल्यानंतर आता यासंदर्भात देशातील वेगवेगळ्या भागातून प्रतिक्रिया येत आहेत.यावर आता हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने आंदोलन केले असून याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कंगणा रणौतच्या कार्यालयात हतौडा चालवला गेला असून हि कारवाई मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे करण्यात आली आहे. कंगणाचं कार्यालय तोडल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अभिनेत्री कंगणा रणौतची बाजू घेतल्यानंतर शिवसेनेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळाले होते.

आता कंगणाविरोधात कुणी काहीच बोलू नये असा आदेश मातोश्रीवरुन आल्याची माहिती आहे. या प्रकरणी आता शिवसेना आणि मुंबई महापालिकेने माघारी घेतल्याचं चित्र निर्माण झाले आहे.अशातच आता कंगणाच्या समर्थनार्थ हिमाचल प्रदेशमध्ये आंदोलन सुरू झाले आहे. कंगना ही मूळची हिमाचलची आहे. त्यामुळेच मुंबईमध्ये महानगरपालिकेने केलेल्या कारवाईनंतर हिमाचलमधील अनेकांनी या कारवाईचा निषेध केला आहे. गुरुवारी भाजपाच्या महिला मोर्चाने मुंबईमध्ये झालेल्या कारवाईचा विरोध करण्यासाठी कंगनाच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.

समोर आलेल्या माहिती नुसार हिमाचलमधील भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख शाशिम धर सूद यांनी एका व्हिडिओमध्ये प्रियंका यांचा बंगला पाडण्याचा इशारा दिला होता. या व्हिडिओमध्ये सूद यांनी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईचा निषेध केला. “गरज पडली तर आम्ही शिमल्यात घर बांधणाऱ्या आणि क्राँग्रेस की बेटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रियंका गांधीनाही आम्ही सोडणार नाही. आम्ही आश्वासन देतो की आम्ही त्यांचं घरही तोडू,” असं सूद या व्हिडिओत म्हणाल्या आहेत.

भाजपाच्या महिला नेत्याने दिलेल्या या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी मात्र असहमती व्यक्त केली आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्र सरकारने हिमाचलच्या मुलीला लक्ष्य केलं आहे त्याची आम्ही निंदा करतो, मात्र आम्ही या वक्तव्याचे समर्थन करत नाही, असं ठाकुर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

माझी तब्येत ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या- प्राजक्त तनपुरे

कंगनाच्या ड्रग्स प्रकरणी प्रश्न विचारले असता गृहमंत्र्यांनी उत्तर देणे टाळले

तहसील कार्यालयातील रिकामी जागा का हवी आहे ‘या’ माजी आमदारांना

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!