Share

सार्वजनिक स्वच्छतागृहास कंगना राणावतचे नाव; शिर्डीतील शिवसैनिक आक्रमक

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कंगना राणावत आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. कंगनाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले असून शिर्डी शहरातील शिवसैनिकांनी तसेच शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाला कंगना राणावतचे नाव दिले आहे. तसेच कंगनाचा फोटो त्याठिकाणी चिटकविण्यात आला आहे.

मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय, गुंड व माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची भीती जास्त वाटते, अशी वक्तव्य केल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिर्डी शहरातील शिवसैनिकांनी आणि शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कंगनाचा निषेध व्यक्त केला आहे. तिने केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत सार्वजनिक शौचालयावर लावण्यात आलेल्या कंगनाच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते, तालुकाप्रमुख संजय शिंदे, विजय जगताप, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अनिताताई जगताप, तालुकाप्रमुख कस्तुरी मुदलीयार, शहरप्रमुख लक्ष्मी असणे, तालुका संघटक स्वाती परदेशी, मीनाक्षी डुबल, संगीता जगताप, उपतालुकाप्रमुख अक्षय तळेकर, अमोल गायके, सोमनाथ महाले तसेच शिवसेना पदाधिकारी व तालुक्यातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

माझी तब्येत ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या- प्राजक्त तनपुरे

कंगनाच्या ड्रग्स प्रकरणी प्रश्न विचारले असता गृहमंत्र्यांनी उत्तर देणे टाळले

तहसील कार्यालयातील रिकामी जागा का हवी आहे ‘या’ माजी आमदारांना

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!