Share

भारतात प्रथमच येणार ‘या’ कंपनीची ‘लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह’ कार !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोरोना नंतर उद्योग व्यवसाय उभारी घेत आहेत. यामध्ये वाहन उद्योगांमध्ये नवनवीन अद्ययावत वाहने बाजारपेठेत यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्याप्रमाणावर वापर होत आहे. त्याचबरोबर सरकारकडून देखील वायू आणि ध्वनी प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी नागरिकांना आवाहन करून प्रोत्साहन दिले जात आहे.

दरम्यान, भारतात होंडा कार्स इंडिया लिमिटेड या कंपनी लेफ्ट हॅन्ड ड्राईव्हचे मॉडेल तयार करत आहे. पाचव्या आवृत्तीच्या नवीन होंडा सिटी निर्यातीसाठी हे मोडेल असेल या मध्यमातून कंपनी भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामध्ये योगदान देईल असे कंपनीने सांगितले.

यासाठी गाडीच्या पाचव्या आवृत्तीच्या निर्यातीसाठी गुजरातमधील पिपावाव बंदर आणि चेन्नईच्या एन्नोर बंदर येथून मध्य पूर्व देशांमध्ये रवानगी केली आहे. केले. होंडा कार्स इंडिया मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून नवीन होंडा सिटीचे राईट हॅन्ड ड्राइव्ह मॉडेल्स दक्षिण आफ्रिकेत निर्यात करीत आहे. ऑक्टोबर २०२० पासून कंपनीने शेजारचे देश नेपाळ आणि भूतानला निर्यात करण्यास सुरवात केली आहे.

अनेक देशांमध्ये लेफ्ट हॅन्ड ड्राईव्हचे मॉडेल वापरले जात असल्याने होंडा सिटी ही भारतातील सेडान सेगमेंट कारची एक बेंचमार्क आहे. त्यामुळे अद्ययावत अशा लेफ्ट हॅन्ड ड्राईव्हचे पूर्णपणे नवीन बाजारपेठेत निर्यात केल्यास वाहन बाजारात भारताला मोठी संधी मिळणार आहे. जागतिक स्तरावर कंपनीने उत्पादन प्रकल्प बनविण्यासाठी मोठी गुंतवणूक केली असून राईट हॅन्ड ड्राइव्ह व लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह असे दोन्ही ड्राईव्ह मॉडेल्स तयार करण्यात येणार आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यास मदत होईल. पाचव्या आवृत्तीच्या होंडा सिटीला भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीच्या ‘मेक इन इंडिया’ च्या बांधिलकीच्या अनुषंगाने होंडा कार्स इंडिया लिमिटेड आपल्या सर्व मॉडेल्सचे उत्पादन 90 टक्क्यांहून अधिक लोकल उपकरणे वापरून तयार करीत आहे आणि यामध्ये एक मजबूत इको सिस्टम विकसित केली आहे.

एचसीआयएल नेपाळ, भूतान, दक्षिण आफ्रिका आणि एसएडीसी देशांना अमेझ, डब्ल्यूआर-व्ही आणि सिटी यासह विविध मॉडेल्सचे निर्यात करीत आहे. पाचव्या आवृत्तीच्या नवीन होंडा सिटी (राईट हॅन्ड आणि लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह ) भारताच्या निर्यात व्यवसायासाठी एक नवीन संधी ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!