Share

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक; आज होणार फैसला

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा (Kolhapur District Central Co-operative Bank election) फैसला थोड्याच वेळात होणार आहे. शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी थेट लढत असणार आहे. दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली असून आता थोड्याच वेळात याचा निकाल लागणार आहे.

यापूर्वी सत्ताधारी गटाने सहा जागा जिंकल्या असल्या तरी उर्वरित १५ जागांवर कोण बाजी मारणार हे आज कळेल.  या निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्र आघाडी केली आहे. तर सत्तारूढ गटाचे नेतृत्व बँकेचे अध्यक्ष ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील , सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे करीत आहेत. तसेच शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी आव्हान दिले आहे.

आता तीन तासानंतर या निवडणुकीचा निर्णय कळणार आहे. रमणमळा भागातील बहुउद्देशीय इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक अरुण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरु आहे.आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!