कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. यावर्षीच्या केवळ साडेसहा महिन्यांत जिल्ह्यात १ लाख ३२ हजार ५५१ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले असून, महत्वाचे म्हणजे केवळ दुसऱ्या लाटेत ३३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेच्या तोंडावर आरोग्य यंत्रणा आणखी भक्कम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची गरज आहे.
मध्यंतरी झालेली गोकुळची निवडणुक, लोकप्रतिनिधींनी राजकीय स्वार्थापोटी व्यवहारबंदी करण्यास लावलेला उशीर, स्थानिक पातळीवर न घेतलेली कडक भूमिका व नागरिकांची बेफिकिरी यामुळे मे आणि जून या दोन महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला.मे महिन्यात ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. प्रशासनाकडूनही नियम अंमलबजावणीमध्ये चाललेलला धरसोडपणा व नागरिकांनी पायदळी तुडवलेले नियम या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनास्थिती अजूनही नियंत्रणामध्ये आलेली नाही.
याचाच परिणाम म्हणजे व्यावसायिकांमध्ये पसरलेली तीव्र नाराजी आहे. कोरोनाच्या काळात निवडणूकीला परवानगी आहे पण सर्वसामान्यांचा व्यवसाय सुरू करतेवेळी मात्र नियम कठोर केले जात आहेत, यामुळे लोकप्रतिनिधींच्या विषयी व्यापारी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात एक कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपदे आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर हे कोल्हापूरचे असताना सुद्धा कोल्हापूरची कोरोना परिस्थिती का नियंत्रणात येत असा सवाल व्यापारी वर्ग करत आहे.
कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तराचे निर्बंध आहेत. कोल्हापूरमध्ये चौथ्या स्तराचे निर्बंध असून अत्यावश्यक/जीवनावश्यक सेवा वगळता इतर व्यापाराला पूर्णपणे बंदी आहे. मागील तीन महिन्यात कोल्हापुरात कडक निर्बंध असून आता व्यापाऱ्यांचा संयम सुटत आहे. गेल्या आठवड्यात ५ दिवस निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली, मात्र यानंतर पुन्हा अचानक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘पटोले, चव्हाण, जगताप यांच्यावर आंदोलनानंतर गुन्हे दाखल केले का?’; नरेंद्र पाटलांचा सवाल
- ‘जे काँग्रेस नेते भाजपला घाबरतात त्यांना पक्षातून हाकलून द्या’, राहुल गांधींची सडेतोड भूमिका
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘पवार हे धोकेबाज नाहीत तर ते देशाचे नेते आहेत, राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना बळीचा बकरा करू नये’
- ‘श्रीपादचे छिंदम’चाळे सुरूच! टपरी चालकाला शिवीगाळ करत मारहाण; अॅट्रॉसिटी दाखल


