पुणे प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने 34 वर्षापूर्वी याच दिवशी कुटुंबासह आत्महत्या केली होती. करोना पेक्षाही शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय आहे . केवळ शेतकरी विरोधी कायदे अस्तित्वात असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी किसान पुत्र संघटनेतर्फे अमर हबीब यांनी केली आहे.
किसान पुत्र संघटनेतर्फे राज्यभर अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण सहभागी झाले आहेत. करोना मुळे लोकांची गर्दी होऊ नये म्हणून ज्याने त्याने आहे त्या ठिकाणी अन्न त्याग करावा, आवाहन अमर हबीब यांनी केले होते. त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. स्वतः अमर हबीब हे पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिराच्या समोर निवडक कार्यकर्त्यांसह अन्नत्यागून बसले आहेत. त्यांनी केलेल्या मागणीनुसार कमाल शेतजमीन धारण कायदा, आवश्यक वस्तू कायदा आणि आणि जमीन अधिग्रहण कायदा रद्द झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. हे तीन कायदे रद्द केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असा दावा अमर हबीब यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

