Share

सोमय्यांचाच वाधवानांशी संबंध; केंद्रीय गृह-खात्यातून दबाव आणून परवानगी मिळवली : नवाब मलिक

Published On: 

मुंबई : वाधवान बंधूंच्या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच लक्ष्य केले आहे. आता तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या पाठींबा असल्याशिवाय वाधवान बंधूंना परवानगी मिळणार नाही, असा गंभीर आरोप केला आहे. याबाबतचे वृत्त ABP माझाने प्रसिद्ध केले आहे.

वाधवान प्रकरणावर किरीट सोमय्या यांचा पवार परिवारावर घणाघात केला आहे. शरद पवार आणि वाधवान कुटुंबियांचे घरगुती संबंध असल्याचं जगजाहीर आहे, असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे. पवारांच्या पाठिंब्याशिवाय गृह सचिवांकडून विशेष परवानगी पत्र मिळणं अशक्य आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

देश लॉकडाऊन असताना मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सात गाड्यांमधून हे 23 जण मुंबईतून बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता महाबळेश्वरमध्ये आले. डीएचएसएल दिवान हौसिंग फाईनान्स यांच्या बंगल्यावर हे सर्वजण वास्तव्यास होते. मात्र चौकशी होताच वाधवान बंधूंना होम क्ववारांटाईन करण्यात आले.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जायची परवानगी मिळतेच कशी ? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. तर या प्रकरणाची राज्यपाल यांनी चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

यातून एक धक्कादायक वृत्त असे समोर येत आहे की, राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबीय हे मुंबईहून महाबळेश्वरला पोहचले होते. मात्र हे त्यांना देण्याची परवानगी अमिताभ गुप्ता यांना मिळालीच कशी असा सवाल आता विचारला जात आहे.

नवाब मलिक यांचा दावा –

सोमय्यांनी पवारांवर आरोप केल्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी झी २४ तास या वाहिनीवरील कार्यक्रमावरील चर्चेत किरीट सोमय्या यांच्या घरातील मुलगी धीरज वाधवान यांच्या व्यावसायिक भागीदार असलेल्या व्यक्तीच्या घरात आहे. त्यामुळे किरीट सोमय्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्फत दबाव आणून हे परवानगी मिळवली आहे असा आरोप केला आहे. तसेच चौकशी होऊन सर्व दोष्नीवर कारवाई केली जाणार आहे असंही मलिक म्हणाले.

सोमय्यांनी फेटाळले आरोप –

दरम्यान किरीट सोमय्यांनी याच कार्यक्रमात हा आरोप फेटाळला आहे. तसेच आमच्या मुली दिल्या असल्या तरी वाधवान यांच्या आर्थिक गैरव्यवहारा संबंधी मीच तक्रार केली असल्याचा दावा केला आहे. तसेच सरकारने आम्ही विचारतोय त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. चर्चा दुसरीकडे नेऊ नये असंही म्हटलं आहे.

हेही पहा –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!