मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना असा सामना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. किरीट सोमय्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. सोमय्यांनी काही दिवसापूर्वी आपण ठाकरे सरकारच्या तीन विकेट पाडणार असं म्हंटल होत. सोमय्यांनी आता शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी अनिल परब यांनी वांद्रे येथील म्हाडाच्या दोन इमारतींमधील मधल्या जागेत अनिल परब यांनी अनधिकृतरित्या आपले कार्यालय थाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
अनिल परब यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा बळकावली. या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, अस म्हंटल आहे. आता या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या असा सामनाही रंगण्याची शक्यता आहे. आता यावर अनिल परब सोमय्यांच्या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.
विलास शेगले हे या अनधिकृत बांधकामाबाबत संघर्ष करत आहेत. २७ जून २०१९ रोजी म्हाडाने अनिल परब यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर ठाकरे सरकारच्या दबावामुळे अनिल परब यांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई झाली नसल्याचे किरीट सोमय्यांचे यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझेची तब्येत पुन्हा बिघडल्याने रुग्णालयात नेण्याची वेळ
- नांदेड जिल्ह्यात संचारबंदीतही ३५ हजारांची दारु जप्त
- कोरोनाच्या नावाखाली सरकार वेडेपणा करत असेल तर अशा घटना घडणारच; कॉंग्रेस नेत्याने दिला घरचा आहेर
- तृणमूल खासदार प्रचाराला वैतागल्या ? भाजपकडून तृणमूल काँग्रेस ट्रोल
- महसूल विभागाच्या आशीर्वादाने संचारबंदीतही वाळूचा अवैध उपसा सुरु

