Share

पुणे महानगरपालिकेत किरीट सोमय्यांचा सत्कार; भाजपचे शक्ति प्रदर्शन

Published On: 

🕒 1 min read

पुणे: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज पुण्यात आले. त्यांच्या स्वागतार्थ पुणे भाजप कार्यकर्त्यांनी महानगरपालिका भवनासमोर मोठी गर्दी करत शक्ति प्रदर्शन केले. तसेच त्यांचे त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जेथे पाडले होते तेथेच जंगी स्वागत देखील केले. मागील आठवड्यात ५ फेब्रुवारी रोजी सोमय्या पुण्यात आले असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्का बुक्की केली होती. दरम्यान ते संचेती रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी संजय राऊत यांचे काही गैरव्यवहार आणि व्यवसाय ते पोलीसांना सांगणार होते. त्यांनी आदल्या दिवशी (४ फेब्रुवारी) पत्रकारांना सांगून मी उद्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे अशी माहिती दिली होती.

या घटनेनंतर आपल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे पत्र किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सरकारला पाठवले आहे. त्यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोर यांच्यासह इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याशी मिळून जंबो कोव्हिड सेंटरचा घोटाळा केला असे आरोप किरीट सोमय्या यांनी केले होते. आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

महत्वाची बातमी:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!