Share

CABअंतर्गत घुसखोरी बांगलादेशींवर कारवाई करावी, सोमय्यांचे CM ठाकरेंना पत्र

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यात लागू करावे अशी मागणी केली आहे. तर भूतकाळातील एका घटनेचीही आठवण करून दिली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.

हे वादग्रस्त विधेयक राबवण्यास काही राज्यांनी नकार दर्शवला आहे. तर महाराष्ट्रातही हे विधेयक राबवले जाणार नाही, असे विधान कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनी केले आहे. यावर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की, शिवसेना आणि भाजपाने एकत्र मिळून बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आवाज उठवला होता. शिवाजीनगर, गोवंडी, चांदिवली, मुबई, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे या घुसखोरी बांगलादेशींवर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान मोदी सरकारने मंजूर करून घेतलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू न करण्याचा निर्णय भाजपविरोधी सरकारे असलेल्या राज्यांनी घेतला आहे. पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल यांनी तसे जाहीरच केले आहे, तर काँग्रेसचे श्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याची आम्ही अंमलबजावणी करू, असे मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र याबाबत कोणती भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचं असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1205748230085955585?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205744474661376003?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205741834384752641?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!