🕒 1 min read
मुंबई : भाजपचे आक्रमक नेते किरीट सोमय्या हे राज्यात नेहमी चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. पवार कुटुंबीयांनी यांनी केलेल्या घोटाळ्याचे कागदपत्र मी ईडी आणि इन्कम टॅक्सला देणार आहे असा धमकी वजा इशारा सोमय्या यांनी दिला होता.
दरम्यान सोमय्या यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले ‘मी आज १ वाजता नवघर मुलुंड पूर्व पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला जाणार. १५ ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी माझ्या निवासी कार्यालयात महापालिका इंजिनिअर (आणि पोलीस) अर्धा डझन गुंडांना घेऊन आले, धक्काबुक्की, तोडफोड केली. माझ्या झेड सुरक्षा व्यवस्थेची छेडछाड केली, त्याची तक्रार मी दाखल करणार आहे’
मी आज १ वाजता नवघर मुलुंड पूर्व पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करायला जाणार.
१५ ऑक्टोबर दसरा चा दिवशी माझा निवासी कार्यालयात महापालिका इंजिनिअर (आणि पोलीस) अर्धा डझन गुंडांना घेऊन आले, धक्काबुक्की, तोडफोड केली.
माझा झेड सुरक्षा व्यवस्थेची छेडछाड केली, त्याची तक्रार दाखल करणार
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 19, 2021
दरम्यान किरीट सोमय्या हे नेहमी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करत असतात. आता त्यांनी आपला मोर्चा महापालिका अधिकाऱ्यांकडे वळवला असल्याने आता या अधिकारांच्या अडचणीत वाढ होणार का ? हे पहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- आर्यन खानच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या नेत्याने सर्वोच्च न्यायालयात केली याचिका दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
