Share

“ठाकरे सरकारच्या कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांची आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल”

Published On: 

🕒 1 min read

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Jumbo Covid Center scams) कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदरील आरोपींवर सात दिवसात गुन्हा दाखल करा, अन्यथा आझाद मैदाना पोलीस ठाण्याच्या विरोधात कोर्टात तक्रार करणार असल्याचा इशाराही किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि बीएमसी आणि महाराष्ट्र सरकार विरुद्ध आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये 89 पानांची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांचे कौटुंबिक पार्टनर सुजीत पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहयोगाने कोव्हिड रुग्णांच्या जीवाशी खेळून कोटींचा खेळ केला. कंपनी अस्तित्वात नसतानाही बोगस कागदपत्रांद्वारे कंत्राट मिळवलं असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान आज शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. यावरही प्रतिक्रिया देताना सोमय्या यांनी म्हटले की, बाबा बाबा बाबाबाबा संजय राऊत यांनी आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. टाईमपास आणि नौटंकी नंतर करा. या घोटाळ्याची कागदपत्रं दिली तरी उद्धव ठाकरे का कारवाई करत नाही? सोमय्या रोज डॉक्यूमेंट देत आहे. कागदपत्रं खोटी असतील तर मला अटक करा. धमक्या कुणाला देता? असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!