Share

औरंगाबाद होणार ‘कचरामुक्त’; महापालिकेने केले नव्या प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन!

Published On: 

औरंगाबाद: हर्सूल येथे सुका कचरा वर्गीकरण केंद्राचे (Material Recovery Facility M.R.F Plastic Aggregation Centre) उद्घाटन बुधवारी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve), औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय(Aastik Kumar Pandey), जिल्हाधिकारी सुनील चव्हाण(Sunil Chavan), माजी खासदार चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देतांना पाण्डेय म्हणाले की, या एमआरएफ केंद्रावर सुरुवातीला एक टन सुका कचरा प्रती दिवस प्रक्रिया करण्यात येणार आहे. तीन महिन्यानंतर याची शमता वाढून १० टन प्रति दिवस करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक झोनमध्ये एक असे एकूण नऊ एमआरएफ केंद्र उभारण्याचा मनपाचा मानस आहे. सद्यस्थितीत कांचनवाडी, रामनगर, सेंट्रल नाका आणि हर्सूल असे एकूण ४ एमआरएफ केंद्र कार्यान्वित झाले आहेत. प्रशासक पाण्डेय पुढे म्हणाले की भविष्यात उरलेले ५ एमआरएफ केंद्र कार्यान्वित झाल्यावर सुमारे १०० टन सुक्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट शक्य होईल.

याशिवाय कांचनवाडी येथे ३० मेट्रिक टन क्षमतेचे बायोमिथेनायझेशन प्लांट कार्यान्वित आहेत. याच बरोबर १५० मेट्रिक टन क्षमतेचे चिकलठाणा आणि पडेगाव कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित आहेत, १५० मेट्रिक टन क्षमतेचा हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यावर या तीन केंद्रावर एकूण ४५० मेट्रिक टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, तसेच ३० मेट्रिक टन कचऱ्यावर कांचनवाडी बायोमिथेनायझेशन प्लांट येथे प्रक्रिया केली जात आहे.

२०४० पर्यंत शहरात निघणाऱ्या १०० टक्के कचऱ्याची विल्हेवाट

भविष्यात एकूण ४८० मेट्रिक टन कचऱ्याची आणि १०० मेट्रिक टन सुका कचरा अशा ५८० मेट्रिक टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे आणि शहर शून्य कचरा निर्मितीच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज सुमारे ४२५ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या प्रमाणे भविष्यात २०४० पर्यंत शहरात निघणाऱ्या १०० टक्के कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. आणि शहर कचरा मुक्त होणार आहे, प्रशासक पाण्डेय म्हणाले. यावेळी पालकमंत्री यांनी या नियोजनाचे कौतुक केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!