Share

आर्यन खानसोबत सेल्फी घेतलेल्या किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Published On: 

पालघर : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काढल्यामुळे किरण गोसावी हा चर्चेत आला होता. किरण गोसावी हा एनसीबीचा साक्षीदार आहे. परंतू या किरण गोसावीवर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पालघरमधील दोन तरुणांना परदेशात नोकरी लावून देतो असे सांगून त्याने लाखो रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार केळवे सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

दोन वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यातील उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना किरण गोसावीने मलेशियात नोकरी लावून देतो असे सांगून दीड लाख रुपयांना गंडा घातला. त्यानंतर तो फरार झाला आणि थेट आर्यन खान सोबतच्या सेल्फीमध्ये दिसून आला असे या तरुणांनी म्हंटले आहे.

नवी मुंबई येथील कार्यालयातून तो हे रॅकेट चालवतो. या तरुणांनी त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकिट आणि व्हिसा दिला. हे तरुण कोचीन विमानतळावर पोहचल्यानंतर तिकिट व व्हिसा बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर या तरुणांनी पालघर जिल्ह्यातील केळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी ती दाखल करुन घेतली नाही. आता किरण गोसावीचे कारनामे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!