Share

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना खडसेंनी वर्तवलेला ‘तो’ अंदाज खरा ठरला – मलिक

Published On: 

मुंबई : ईडी आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले  ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अंमलबजावणी संचालनालयाने खडसेंना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ईडीची नोटीस मिळाली असल्याचा खुलासा स्वतः एकनाथ खडसे यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणातून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे किंवा कोणते अन्य प्रकरण आहे, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

खडसेंना ईडीने नोटीस बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या सर्व नेत्यांचा रोख हा भाजपकडे आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ‘भाजप सूडबुद्धीचं राजकारण करत आहे. खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतानाच यासंदर्भात संकेत दिले होते. ‘मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आता ईडीचा ससेमिरा माझ्यामागे देखील लावतील, मात्र त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असं विधान खडसेंनी केलं होतं. त्यामुळे खडसेंनी वर्तवलेला हा अंदाज खरा ठरल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!