🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये आज स्पर्धेतील ६७वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात कप्तान हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीमुळे गुजरातने बंगळुरूला १६९ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात हार्दिकने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आरसीबीला आज मोठा विजय आवश्यक आहे.
गुजरातचा डाव
वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने सलामीवीर शुबमन गिलला (१) स्वस्तात बाद करत बंगळुरूला लवकर यश मिळवून दिले. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू वेडने (१६) थोडी फटकेबाजी केली, पण ग्लेन मॅक्सवेलने त्याला पायचीत पकडले. कप्तान हार्दिक पंड्याने गुजरातसाठी अर्धशतकी झुंज दिली. डेव्हि़ड मिलरने त्याला साथ दिली. मिलरने ३४ धावा केल्या. राहुल तेवतियाही (२)अपयशी ठरला. शेवटच्या षटकात हार्दिक-राशिदने १७ धावा वसूल केल्या. २० षटकात गुजरातने ५ बाद १६८ धावा केल्या. हार्दिक ४ चौकार आणि ३ षटकारांसह ६२ धावांवर राहिला. तर राशिदने १ चौकार आणि २ षटकारासंह १९ धावांची नाबाद खेळी केली. हेझलवूडने आरसीबीसाठी सर्वाधिक २ बळी घेतले.
Time to defend.. Let's go Titans ????#RCBvGT | #AavaDe | #TATAIPL pic.twitter.com/siWeWxHk4S
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 19, 2022
दोन्ही संघांची Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल, जोश हेझलवूड.
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रवीश्रीनिवासन साई किशोर, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
