Share

‘कोरोना विरोधातील लढाईपेक्षा सत्तेतील तीन पक्षांना मान अपमानाची गणितं महत्त्वाची वाटतात’

Published On: 

मुंबई : महाविकासआघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीतून काँग्रेसच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होत आहे.

राज्यातील सध्याच्या संकटाच्या काळात घेतले जाणारे विविध निर्णय तिन्ही पक्षांनी चर्चा करुन घेणं काँग्रेसला अपेक्षित आहे. मात्र निर्णय घेताना आणि मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रकियेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते आहे. त्यात सहभाग नसल्याची काँग्रेसची धारणा झाली आहे.

एकीकडे कॉंग्रेसच्या मंत्र्यांची बैठक, दुसरीकडे शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री न मिळाल्याने देखील काँग्रेस नाराज होती. त्यानंतर विधान परिषदेत एक जागा कमी मिळाली तेव्हा ही काँग्रेस नाराज झाली. आता निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेस पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे.

कॉंग्रेसच्या या नाराजीवर आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘या कोरोना संकटात कोरोना विरोधातील लढाईपेक्षा सत्तेतील तीन पक्षाना मान अपमानाची गणित महत्त्वाची वाटतात. जनतेच्या प्रश्नावर हे नेते वाद घालत नाहीत तर मान अपमान, प्रोटोकॉल वर भांडणे सुरू आहेत. अर्थात लोकभावनाचा अपमान करून सत्तेवर आलेल्यांकडून कोणती अपेक्षा ठेवणार’? असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केलाय.

मुख्यमंत्री आणि पवारांचा दौरा संपताच फडणवीस निघाले दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!