मुंबई : महाविकासआघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीतून काँग्रेसच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होत आहे.
राज्यातील सध्याच्या संकटाच्या काळात घेतले जाणारे विविध निर्णय तिन्ही पक्षांनी चर्चा करुन घेणं काँग्रेसला अपेक्षित आहे. मात्र निर्णय घेताना आणि मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रकियेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते आहे. त्यात सहभाग नसल्याची काँग्रेसची धारणा झाली आहे.
मुख्यमंत्री आणि पवारांचा दौरा संपताच फडणवीस निघाले दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर
महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री न मिळाल्याने देखील काँग्रेस नाराज होती. त्यानंतर विधान परिषदेत एक जागा कमी मिळाली तेव्हा ही काँग्रेस नाराज झाली. आता निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेस पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला बाळासाहेब ठाकरे स्मारकावर दाखल झाले आहे. पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावरून परतल्यानंतर ही महत्वपूर्ण भेट होत आहे. निसर्ग चक्रवादळग्रस्त भागातील उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. मात्र आज काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक तातडीची बैठक होत आहे. कॉंग्रेस मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील नाराजीमुळे ही बैठक राज्याच्या आगामी राज्कारांच्या दृष्टीने अत्यंत अत्यंत महत्वाची मानली जात असताना, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या यावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या आमदारकीच्या ऑफरवर राजू शेट्टी यांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया

