Share

“सत्तेची मस्ती पाहुनी मस्ती, जनता म्हणते हे नक्की राष्ट्रवादी”

Published On: 

मुंबई : भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पोलिसांना पोलीस ठाण्यात जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप केला आहे. “शिव्या देती, बघून घेतो म्हणती, हे भविष्य आमच्या हाती, मी राष्ट्रवादी” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

या ट्वीटमध्ये केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Uddhav Thackeray), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांना टॅग करत या आमदारावर कारवाई करणार का? असा सवालही केला आहे.

“उंचावून माना फुगवून छाती, आपल्या आमदाराची पाहून प्रगती, आवाज घुमवती, शिव्याही देती, साहेबांच्या डोळ्यापुढती, नवीन स्वप्ने फुलून येती, सत्तेची ही पाहुनी मस्ती, जनता म्हणते, हे तर नक्की, राष्ट्रवादी! शिव्या देती, बघून घेतो म्हणती, हे भविष्य आमच्या हाती, मी राष्ट्रवादी”, असे केशव उपाध्ये ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!