टीम महाराष्ट्र देशा : केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी ) मुळे अशांतता आणि अस्वस्थता पसरली आहे. या कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलनं होत असून सीएएला मोठा विरोध होता आहे. या पार्श्वभूमीवर विजयन यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह इतर राज्यातील 11 मुख्यमंत्र्यांनादेखील पत्र लिहलं आहे.
विजयन यांनी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता आबाधित राखण्याची गरज व्यक्त केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा हा संविधान विरोधी आहे. त्यामुळे या विरोधात सर्व भारतीयांनी एकत्र येणे गरजेचं आहे, असं पिनारायी यांनी पत्रात लिहलं आहे. पिनारायी विजयन यांनी महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, पुदुचेरी, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि ओडिया या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सीएए विरोधात भूमिका घेण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, माकप पक्षाचे विजयन यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातला ठराव विधानसभेत मंजूर करुन घेतला आहे. असा ठराव करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे.
केरळ विधानसभेने वादग्रस्त सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील ठराव संमत केल्यानंतर मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी त्याबाबत ११ राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता टिकवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) रद्द करावा, असा ठराव केरळ विधानसभेने मंगळवारी संमत केला. त्याला विरोधी पक्ष काँग्रेस आणि यूडीएफ यांनी समर्थन दिले असून भाजपचे एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी मात्र विरोध केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

