Share

केळगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला दोन वर्षांपासून मिळेना आरोग्यसेविका

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यसेविकेचे पद रिक्त असून मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने गावक-यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

६ हजारच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावात एक उपकेंद्र आहे. त्यात केळगावसोबत आधरवाडी, तांडा, कोल्हाळा, कोळी वस्ती, सपकाळ वस्ती असे अनेक गाव वस्त्या आहे. त्यामुळे आराग्यसेविकेअभावी रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी येथून १० किमी अंतरावर असलेल्या आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते असल्याने त्यांची हेळसांड होते. तर काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या वतीने येथे एक तरी आरोग्यसेविका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सध्या कोरोनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. तरी सुध्दा आरोग्य उपकेंद्र कर्मचारी व अधिकारी जाणीव पुर्वक याकडे दुर्लक्ष करीत असून या उपकेंद्राच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडेही आरोग्य विभागाचे अक्षम्य दूर्लक्ष होत आहे. हा रामभरोसे कारभार थांबवून वरिष्ठांनी येथील रिक्त पद तात्काळ भरावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रिक्त पदे ही जिल्हा स्तरावरून भरण्यात येतात. केळगाव येथे तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य सेविका दिली होती. परंतू त्यांची बदली झाल्याने आम्ही तात्पुरत्या स्वरूपात का होईना तेथील पद भरण्याचा प्रयत्न करू.
– डॉ.योगेश राठोड, तालूका आरोग्य अधिकारी

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!