🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने Rain थैमान घातले आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकरी राजाला मोठा फटका बसला असून राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाच्या धुमाकळीमुळे शेतकऱ्याची हातात तोंडाशी आलेली पिकं वाया गेली आहे. याचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला असून शेतीतील सोयाबीन, कापूस, मूग इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अहमदनगर नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देखील या परतीच्या पावसाने चांगलं झोडपलं आहे.
दिवाळी सण तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्याला परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसलेला असून राज्यातील शेतकरी कोलमडला आहे. सध्या राज्यात सर्वत्र खरीप पिकांची काढणी सुरू आहे पण या परतीच्या पावसाने पिकांची काढणी मात्र पूर्ण करू दिलेली नाही. दरम्यान, निम्म्याहून अधिक पीक पावसामुळे वाया गेली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी राज्य सरकारला तात्काळ मदतीची मागणी केली आहे.
पावसामुळे Rain मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान
मराठवाड्यातील काही भागांना परतीच्या पावसाने चांगलं झोडपल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे रस्त्यांना आणि नाल्याला नदीचे स्वरूप आले असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता. अनेक नद्यांना आणि ओढ्यांना पूर आल्यामुळे शेतीच्या पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात काही भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस थांबायचं नाव घेत नसून सकाळपासूनच काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काढणीला आलेल सोयाबीनचं पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचा मोठं नुकसान झाल आहे.
हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना दिलासा
ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकणात रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी तुरळक पावसाची शक्यता आहे. तर, 22 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रात पावसाची उघडी होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात परतीचा मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे असेही अंदाज हवामान खात्याने दिले आहे. त्यामुळे आता राज्यात दिवाळी दरम्यान पावसाची उघडीप होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- NCP | “…तर तलवारीने हात छाटण्याशिवाय राहणार नाही”, राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट इशारा
- Madhya Pradesh Accident | 14 घरांमध्ये मातम! दिवाळीला निघालेल्या प्रवाश्यांनी भरलेला बसचा ट्रकसोबत भीषण अपघात
- Uddhav Thackeray | “‘पुणे तेथे काय उणे’ असं मिरविणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’चा…”, उद्धव ठाकरेंनी केली भाजपची थट्टा
- Uddhav Thackeray | “पुण्यात राहतोय की पाण्यात?”, पुण्यातील अवकाळी पावसावरून ‘सामना’मधून भाजपवर हल्ला
- Uddhav Thackeray | मातोश्रीवर खलबतं! गौतम अदानी नंतर अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
