बीड : करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम ३०७ आणि एट्रोसिटी कायद्याखाली करुणा शर्मासह आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. काल त्यांना अटक करण्यात आली. आज सोमवारी काही वेळापूर्वी त्यांना अंबाजोगाई कोर्टात हजर करण्यात आले.
आता अंबाजोगाई कोर्टाची सुनावणी झाली असून करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच चालकालाही १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एट्रॉसिटीसंदर्भात ही सुनावणी पार पडली आहे.
परळी येथे येऊन धनंज मुंडे यांच्याविरोधातील पुरावे पत्रकार परिषदेत देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, त्या दुपारी परळीमध्ये आल्या. त्यांनी सुरुवातीला वैद्यनाथ देवस्थानच्या पायरीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांच्या जमावाने त्यांना घेराव घातला. ‘धनंजय मुंडे यांची बदनामी का करत आहात,’ असा जाब विचारत या महिलांनी त्यांना अडवले. त्या वेळी महिलांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. जमावाने त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्नही केला. तर, तुम्ही पैसे घेऊन मला विरोध करत आहात, असा आरोप करत करुणा शर्मा यांनी मारहाण केल्याची तक्रार विशाखा घाडगे व गुड्डी तांबोळी या दोन महिलांनी पोलिसांत दिली.
त्यावरून, करुणा शर्मा यांच्यासह दोघांविरुद्ध परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत करुणा शर्मा यांना शहर पोलिस ठाण्यात नेले. याच काळात त्यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडले आणि खळबळ उडाली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मनी हाईस्ट’मधील ‘या’ भूमिकेत पंकज त्रिपाठीला पाहून चाहते भडकले
- ‘गरीबांची मुले शिकली, मोठी झाली, उच्च विद्या विभूषित झाली तरच त्यांचे जीवनमान उंचावेल’
- अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढणार; ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला


