बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद काही महिन्यांनतर पुन्हा एकदा विकोपाला गेला आला आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लावलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्यासाठी परळीत पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्या परळीत पोहचल्या. मात्र पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या मुलासह परळी पोलिसांनी स्थानबद्ध केले.
करुणा यांचा दोन दिवसांपूर्वी एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही येत असल्याचे त्यांनी सांगितले. या विरोधात आवाज उठविण्यासाठी परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे परळीत तणावपूर्ण वातावरण होते. परळी पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
११ वाजता परळीत दाखल होणार होत्या. मात्र, त्या अडीच वाजता परळीत आल्या. यानंतर वैद्यनाथ मंदिर परिसरात करूणा मुंडे यांच्यात आणि तिथे उपस्थित महिलांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर काही महिलांनी करुणा मुंडे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली. यावरून पोलिसांनी करुणा यांच्या विरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतांना पोलिसांनी करुणा यांच्या गाडीची झाडाझडती घेतली. तेव्हा त्यांना गाडीत एक गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, करुणा शर्मांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय धनंजय मुंडे समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच, पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.
‘परळी माझे सासर आहे आणि मी आता परळीतच रहायला येत आहे. मी मुला बाळांसह येणार आहे. मी आल्यावर मला जिवंत जाळले तरी चालेल, पण मी येणारच आहे’, असा व्हिडिओ करुणा शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच आज सकाळपासून आपण कोठे आहोत, अन् कोठे जाणार आहोत याची माहिती फेसबूकवरून त्या देत होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महापौरांना नक्की कोणाला इज्जत द्यायची होती अन् कोणाची काढायची होती’; निलेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली
- किसान महापंचायतीला भाजप नेते वरूण गांधी यांनी दिला पाठिंबा, म्हणाले…
- ‘इन्फोसिसचे देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान’; ‘त्या’ वादग्रस्त स्टोरीनंतर संघाचे स्पष्टीकरण
- शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार ; किसान महापंचायतीला मुजफ्फरनगरमध्ये झाली सुरुवात
- ‘सत्तेसाठी लाचार शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली’, आ. सावे यांचे दानवेंना प्रत्युत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

